एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य प्रभावशाली महिलांच्या यादीत अव्वल

arundhati
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय च्या प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांना भारतातील उद्योग जगताततील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडले गेले आहे. फॉर्च्यून पत्रिकेने उद्योग क्षेत्रातील ५० प्रभावशाली महिलांची यादी नुकतीच जाहीर केली असून त्यात अरूंधती यांना पहिला क्रमांक दिला गेला आहे. या यादीत दोन नंबरवर आयसीआयसीआयच्या चंदा कोचर तर तीन नंबरवर एक्सिस बँकेच्या शिखा शर्मा आहेत.

अरूंधती भट्टाचार्य यांनी बँकेची बुडीत कर्जे भरून काढण्यासाठी पदभार स्वीकारल्यापासून सतत प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या १ वर्षाच्या कालावधीत त्यांनी कर्जवसुली, नवीन गुंतवणूक आणि बँकेचा खर्च कमी करण्यात विशेष यश मिळविले आहे. स्टेट बँकेच्या विदेशात १९० शाखा आहेत. त्यांची बाजारातील गुंतवणूक १.९ लाख कोटी आहे तर २,२२,०३३ कर्मचारी या बँकेत काम करतात.

या यादीत यंदा आठ नवी नांवेही समाविष्ट झाली आहेत. त्यात सौदर्यं सल्लागार शहनाज हुसेन, आयसीआयसीआय होलसेल बँकींग अध्यक्ष झरीन दारूवाला, आयएल एंड फंड इन्व्हेस्ट मॅनेजमेंटच्या सीईओ अर्चना हिगोरानी, मॅनेजमेंट कन्सल्टंट इरीना विट्टल, कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला तसेच झिपडायलच्या व्यवस्थापकीय संचालक कलेरी वॅगनर यांचा समावेश आहे.

Leave a Comment