सचिनने नोंदवला आणखी एक विक्रम

sachin
मुंबई – सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळताना अनेक विक्रमांशी सांगड केली असून आता तर त्याने निवृत्तीनंतरही एक नवा विक्रम रचला आहे. सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राने प्रकाशनानंतर दोन दिवसातच विक्रीचा नवा विक्रम नोंदवला आहे.

स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावरील पुस्तकाला सचिनच्या आत्मचरित्राने प्रकाशनाच्या दिवशीच विक्रीमध्ये मागे टाकले आहे. सचिनच्या आत्मचरित्राचे प्रकाशक असणा-या हॅचेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस अब्राहम यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘प्लेइंग इट माय वे’ च्या दीडलाख प्रतींसाठी ऑर्डरची नोंदणी झाली आहे. याआधी एकलाख दहाहजार प्रतींच्या छपाईची ऑर्डर होती.

हार्डबॅक वर्गात विक्रीमध्ये सचिनचे आत्मचरित्र डॅन ब्राऊन, जे.के.रोलिंग या लेखकांच्या पुस्तकाला आव्हान देऊ शकते. भारतात याआधी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या आत्मचरित्राची सर्वाधिक विक्री झाली होती. आता हा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

Leave a Comment