शरीफ परिवाराला ३५० कोटीची परतफेड करण्याचे आदेश

sharif
लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या परिवार सदस्यांनी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजासह ३५० कोटी रूपये भरण्याचे आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८२ ते १९९८ या काळात पाकिस्तान नॅशनल बँकेसह विविध आठ बँकांकडून शरीफ आणि त्यांच्या परिवार सदस्यांनी इत्तेफाक समुह कंपन्यांसाठी ३५१ कोटी रूपयांचे सामुहिक कर्ज घेतले होते.त्यातील बहुतेक कर्जाची फेड केली गेलेली नाही. त्यामुळे या कर्जावर व्याज वाढत गेले होते. त्यावर कर्जदार बँकांनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली होती. बँक संघाच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार इत्तेफाक समुहातील ४ कंपन्यांची विक्री करून ६०० कोटी रूपये वसुल केले गेले असले तरी अद्यापीही कर्जाची मोठी रक्कम बाकी आहे.

शरीफ आणि परिवाराने व्याजासह ३५० कोटी रूपये बँक कर्जापोटी भरावेत असा निकाल लाहोर उच्च न्यायालातील दोन सदस्यीय खंडपीठाने गुरूवारी दिला असल्याचे समजते.

Leave a Comment