लक्ष्मीकांत पार्सेकर होणार गोव्याचे नवे मुख्यमंत्री ?

laxmikant
पणजी – राजधानी नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार या प्रश्नाचे उत्तर आता जवळपास निश्चित झाले आहे.

आज सकाळी मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्याचवेळी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची शक्यता आहे.

आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन गोवा विधानसभेच्या विधीमंडळ नेत्याची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते जे. पी. नड्डा यांनी बैठकीनंतर दिली. दुसरीकडे मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन अशी धमकी देणाऱ्या फ्रान्सिस डिसुझा यांनीही आपलं बंड मागे घेतल्याने आता पार्सेकर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे गोव्यात पार्सेकर हे मुख्यमंत्री होणार एवढे निश्चित आहे.

Leave a Comment