रोल्स रॉयसची घोस्ट सीरिज-२ भारतात

royals
मुंबई : भारतीय बाजारात लक्झरी कार बनवणाऱ्या ब्रिटनच्या रोल्स रॉयसने ‘घोस्ट सीरिज-२’ सादर केली असून या नव्या कारची किंमत ४.५० कोटी रुपये आहे.

रोल्स रॉयस एशिया पॅसिफिकचे संचालक स्वेन जे रिटर यांनी रोल्स रॉयससाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ असून सर्वोत्तम कारच्या चाहत्यांसाठी ‘घोस्ट सीरिज-२’ सादर करताना आम्हाला आनंद होत असून घोस्ट मॉडेल एशिया पॅसिफिक क्षेत्रातील पाच बाजारात अतिशय पसंत केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

२००५मध्ये भारतात आलेल्या रोल्स रॉयसचे आजमितीस तीन मॉडेल उपलब्ध असून यामध्ये फॅण्टम, घोस्ट आणि रॅथ यांचा समावेश आहे. कंपनी देशभरातील पाच डिलरच्या माध्यमातून या कारची विक्री करते. घोस्ट पहिल्यांदा २००९मध्ये भारतात सादर करण्यात आली असून कंपनीने २००५ पासून आतापर्यंत तीन माडेल्समधील २५० कारची विक्री केली आहे.

Leave a Comment