मायक्रोसॉफ्ट ल्युमिया ११ डिसेंबरला येणार

micro
नॉन नोकिया ब्रँडचा पहिला वहिला ल्युमिया स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट ११ डिसेंबरला बाजारात आणत असल्याचे संकेत कंपनीने दिले असून या फोनची फिचर्स उघड केली गेलेली नाहीत. नोकियाचे ७.२ अब्ज डॉलर्सला अधिग्रहण केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट हा नोकिया ब्रँड नसलेला पहिलाच स्मार्टफोन स्वतःच्या ब्रँडखाली बाजारात आणत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन हँडसेट मायक्रोसॉफटच्या लोगोसह असेल. तसेच त्याला ५ इंची स्क्रीन, व ८ जीबी इंटरनल मेमरी असेल. हा सेल्फी फोन असेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यातच मायक्रोसॉफटने नोकिया ब्रँडशी विंडोज फोन उपकरणांसाठी नोकियाशी फारकत घेतली जाण्याचे संकेत दिले होते. मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष टुल्ला रायटिला यांनी नोकियाची उपकरणे आता मायक्रोसॉफ्टच्या नावाने बाजारात येणार ही नैसर्गिक बाब असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment