टोलनाके बंद करणे अशक्य – चंद्रकांत पाटील

chandrakant-patil
मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात सध्या सुरू असलेले टोलनाके पूर्णपणे बंद करणे अशक्य असल्याची कबुली दिली. सध्या टोलनाके सरसकट बंद करणे हे सरकारला परवडणारे नसल्यामुळे टोलवसुलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते. परंतु, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्व टोलनाके बंद करणे शक्य नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जे टोल आहेत ते तसेच सुरू राहतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात दिली.

टोलच्या धोरणाचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आढावा घेतला. मुदत संपत आलेले किती टोलनाके बंद करता येऊ शकतात. हे टोलनाके बंद करण्यासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याची माहिती आठवडाभरात सादर करण्याची सूचना पाटील यांनी अधिका-यांना केली.

Leave a Comment