सोशल मीडियाचा डेंग्यूबाबतही वापर करा – मुख्यमंत्री

devendra-fadnavis
मुंबई – राज्यात डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी इतर उपायांबरोबरच सोशल मीडियाचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डेंग्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयात घेतला. मुंबई डेंग्यूबाबतची खबरदारी व मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या उपायांबद्दल सादरीकरण महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले. डेंग्यूबाबत रेडिओ जिंगल्स, रिक्षा-टॅक्सी, प्रसार फेरी याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईत २२७ फवारणी यंत्रांद्वारे डास प्रतिबंधक धूर फवारणी केली जात आहे. एखाद्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील ५०० घरांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच ९०० वर्कर्स डेंग्यूच्या अळ्या शोधण्यासाठी घरोघरी भेट देऊन तपासणीचे काम करीत आहेत. त्यांच्याद्वारे दररोज ५० ते ६० घरे या प्रमाणात साडेदहा लाख घरे तपासली जाणार आहेत, अशी माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

Leave a Comment