सोमवारपासून दहावीच्या अर्जाची प्रक्रिया

msb
मुंबई – मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावीच्या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

ऑनलाइन अर्ज ११ ते २० नोव्हेंबरपर्यंत भरून घेतले जाणार असून, त्यानंतर २१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्क आकारण्यात येईल. आपल्या शाळेच्या माध्यमातून हे अर्ज विद्यार्थ्यांना भरता येतील. मागील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यंदा ही प्रक्रिया दहावीसाठी राबवण्यात येणार आहे. इंटरनेटासंदर्भात तसेच इतर काही अडचणी आल्यास ग्रामीण भागातील शाळांना सूट देण्याचा विचारही शिक्षण मंडळाने केला आहे.

दहावी आणि बारावीसाठी परिक्षा अर्ज भरल्यांनतर शिक्षण मंडळाकडे आणि इतर सरकारी योजनांसाठी विविध परिक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी मंडळाकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.