इंदोर – भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवून आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली आहे. पण याचे लोकार्पण कधी होणार यावर अनिश्चितता कायम आहे.
सानियादेखील लिहीत आहे आत्मचरित्र
इंदोरमध्ये एका मुलींच्या महाविद्यालयात संपन्न झालेल्या ‘सानिया की पाठशाला’ कार्यक्रमा दरम्यान तिने सांगितले की मी माझ्या आत्मचरित्राचे २५-२६ अध्याय लिहिले आहेत. मी जसजशी मोठी झाली त्याप्रमाणे माझ्या या आत्मचरित्रात अध्याय जोडले जात आहेत आणि आता मला याचे लोकार्पण केव्हा करायचे हे ठरवायचे आहे.
त्याचप्रमाणे आजवर इतरांनी आपल्यावर खूप काही लिहिले आहे, त्यात काही सत्य आहे तर काही खोटे त्यामुळे मी असा विचार केला की मीच माझ्याबाबतीत घडलेल्या अनुभवांचा उलगडा लोकांसमोर आत्मचरित्राच्या माध्यमातून ठेवणार आहे.