निस्सान या कार उत्पादक कंपनीने खास भारतीय बाजारासाठी तयार केलेली डाटसन गो कार बाजारातून काढून घेतली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कार सेफ्टी लक्षात घेऊन या कारच्या ज्या क्रॅश चाचण्या घेतल्या गेल्या त्यात ही कार कसोटीस उतरली नसल्याने या चाचण्या घेणारी एनसीएपी संस्था निस्सानच्या सीईओना ही कार बाजारातून माघारी घेण्यासंबंधीचे पत्र लिहिणार असल्याचे समजते.
निस्सानची डाटसन गो बाजारातून काढली जाणार
या कारच्या क्रॅश टेस्ट जर्मनीतील लँडसबर्ग येथे घेण्यात आल्या तेव्हा त्यांना शून्य रेटिंग मिळाले. या कारमध्ये एअरबॅग अथवा एबीएस सारखी सुरक्षा साधने बसविली गेलेली नाहीत. त्यामुळे ही कार संयुक्त राष्ट्रसंघांचे कायदा मियमात बसत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे व त्यामुळेच ती बाजारातून माघारी घेतली जावी अशी सूचना केली गेली आहे.