लवकरच गुगलचे ‘नेक्सस ६ व ९’

nexus
नवी दिल्ली – सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुगलच्या ‘अँड्रॉईड वन’ या स्मार्टफोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता गुगलचे नेक्सस ६ स्मार्टफोन आणि नेक्सस ९ हे टॅब्लेट भारतात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे टॅब्लेट काही दिवसातच भारतात दाखल होतील. ‘नेक्सस ६’ या स्मार्टफोनची किंमत ४४ हजार रुपये असणार आहे तर ‘नेक्सस ९’ या टॅब्लेटची किंमत २८ हजार ९०० रुपये असणार आहे.

मोटोरोलाने ‘नेक्सस ६’ हा स्मार्टफोन विकसित केला असून एचटीसीने नेक्सस ९’ हा टॅब्लेट फोन विकसित केला आहे. ३२ जीबीच्या ‘नेक्सस ६’ ची किंमत प्लेस्टोरवर ४४ हजार रुपये तर ६३ जीबीची किंमत ४९ हजार रुपये आहे. १६ जीबीच्या ‘नेक्सस ९’ टॅब्लेटची किंमत २८ हजार ९०० रुपये तर ३२ जीबीची किंमत ४४ हजार ९०० रुपये आहे. हे दोन्ही फोन कधी उपलब्ध होणार आहे याची तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.

Leave a Comment