मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणार – मुख्यमंत्री

fadanvis
मुंबई – भाजप सरकारकडून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासासाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार असून यापुढे राज्य सरकारकडून मुंबईतील विकासकामांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.

या अधिकाऱ्याला प्रशासकीय कामकाजांमध्ये अतिरीक्त मुख्य सचिवांचा दर्जा देण्यात येणार असून नव्याने नेमणूक करण्यात येणारा हा अधिकारी मंत्रालयातच बसणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सध्या महापालिकेसोबतच एमएमआरडीए, म्हाडा यासारख्या विविध १६ विकाससंस्था मुंबई शहरात काम करत आहेत. पण या सगळ्या संस्थाची कार्यक्षेत्र ही ठरलेली असल्यामुळे नेमण्यात येणारा नवा अधिकारी हा एका दृष्टीने मुंबईच्या प्रश्वांवर मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. त्यामुळे आता मुंबईच्या विकासाची दिशा निश्चित होण्यात मदत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Leave a Comment