मुंबईच्या पाच निवासी डॉक्टरांना डेंगीची लागण

kem
मुंबई – केईएम रुग्णालयाच्या पाच निवासी डॉक्टरांना डेंगीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. याच रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा आणि लॉण्ड्री कर्मचार्‍याचा नुकताच डेंगीमुळे मृत्यू झाला होता. केईएम रुग्णालयातील अस्वच्छता आणि तेथे सुरू असलेले बांधकाम तसेच प्रशासनाचा भोंगळ कारभार याचा त्रास येथील निवासी डॉक्टरांना भोगावा लागत आहे. श्रुती खोब्रागडे या निवासी डॉक्टरच्या मृत्यूनंतरही संथ असलेल्या केईएम प्रशासनाच्या कारभारामुळे रुग्णालयातील पाच निवासी डॉक्टरांना डेंगीची लागण झाली आहे. कार्डिऑलॉजी विभागाचे इरशाद पठाण आणि धीरज मयेकर या डॉक्टरांना डेंगीची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी मेडिसिन विभागाचे डॉ. व्रज दुर्वे, बालरोग विभागातील डॉ. शशी यादव, कार्डिऑलॉजी विभागातील डॉ. अरविंद सिंघ यांना डेंगीची लागण झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेडिसिन विभागाचे डॉ. व्रज दुर्वे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर डॉ. अरविंद सिंग यांना केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे; तर डॉ. शशी यादव यांना केईएम रुग्णालयाच्या एमआयसीयू विभागात ठेवण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment