बिहारमध्ये तंबाखू आणि तंबाखू उत्पादनांवर बंदी

tobacco
पाटणा – बिहार सरकारने कर्करोग आणि तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर आज बंदी घातली. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून जर्दा, पान मसाला आणि अन्य तंबाखू उत्पादनांवर बंदी घातल्याचे जाहीर केले.

तंबाखू उत्पादनांवर बंदी घालण्यात आसाम पहिल्या स्थानावर आहे. बिहार हे देशातील तंबाखू उत्पादनांवर बंदी घालणारे नववे राज्य ठरले असून तंबाखू आणि तंबाखूच्या उत्पादनांवरील करातही वाढ करणार असल्याचे मांझी यांनी सांगितले. तंबाखू आणि त्यापासून बनलेल्या उत्पादनांवर सध्या ३० टक्के कर आकारण्यात येतो. मात्र त्यात दुप्पट वाढ करण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे.

आता बिहारमधील सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात कुचराई झाल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार येईल, असे मांझी म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment