फेसबुकने घेतला ‘इबोला’ रोखण्यासाठी पुढाकार

facebook
सॅन फ्रान्सिस्को – जगभरातून ‘इबोला’ या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून आता फेसबुकने देखील या प्रयत्नात पुढाकार घेतला आहे. फेसबुकने एक विशेष पेज या आजाराशी लढणा-यांना आर्थिक मदत करण्यासाठी तयार केले आहे.

फेसबुक युझर्स या आजाराशी लढणा-यांना या माध्यमातून मदत करु शकतील. ‘टूगेदर वीक कॅन हेल्प स्टॉप इबोला’(Together We Can Help Stop Ebola) असे या पेजचे नाव आहे.

आतापर्यंत या आजाराने पाच हजार जणांचा बळी गेला आहे. फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या पत्तीने इबोलासाठी २५ मिलियन डॉलर्सची मदत केली आहे.

Leave a Comment