प्रक्रियायुक्त अन्नांपासून सावध

food
उत्तम आरोग्यासाठी तसेच निरोगी हृदय, मन आणि शरीर यासाठी रसायनांचा वापर न केलेले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. म्हणून आहार तज्ज्ञांनी प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ खाताना काही पथ्ये पाळण्याचा सल्ला दिलेला आहे. विशेषत: टोमॅटो पूर्णपणे चिरडून त्याचा बारीक लगदा करून त्यात काही रसायने मिसळून तो टिकेल अशी व्यवस्था केलेली असते आणि त्या लगद्यापासून टोमॅटो सॉस, केचअप असे पदार्थ तयार केलेले असतात. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत. कारण या टोमॅटोला चिरडल्यामुळे त्यापासून काही आम्ल तयार व्हायला लागतात आणि ती आम्ले त्या पदार्थाच्या पॅकिंगच्या प्लॅस्टिकशी प्रक्रिया करून नवीन विषारी द्रव्ये तयार होत असतात.

हा धोका टाळण्यासाठी काही उत्पादकांनी बॉक्सच्या आतल्या बाजूला दुसरा एक प्लॅस्टिकचा थर द्यायला सुरुवात केली आहे. पण तोही तेवढाच घातक असतो. तो आतला थर आणि टोमॅटो यांच्या प्रक्रियेतून बिस फेनॉल ए हे द्रव्य तयार होते आणि हे द्रव्य कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. काही प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांमध्ये ते पदार्थ टिकावेत म्हणून भरपूर सोडियम वापरले जाते, ते सुद्धा घातक असते.

सध्या प्रवासात किंवा सहज फिरत जाताना पॉपकॉर्न खाण्याची फॅशन आहे. यातली जे पॉपकॉर्न मायक्रो वेव्हमध्ये तयार केले जाते ते तर फार विषारी असते. कारण त्याच्यामध्ये डायऍसिटिल हे रसायन विकसित होत असते. त्यांच्यामुळे फुुफ्फुसे खराब होतात. अशाच प्रकारचे अनेक दुष्परिणाम डबाबंद खाद्य पदार्थांमुळे होत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment