जागतिक व्यापार मेळ्यात पाकिस्तानचा मोठा स्टॉल

paki
दिल्ली – नोव्हेंबरच्या १४ तारखेपासून नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर भरत असलेल्या जागतिक व्यापार मेळ्यात यंदा पाकिस्तानने सर्वात मोठा स्टॉल बुक केला असून पाकिस्तानातील १२० विविध कंपन्या त्यात सामील होत आहेत असे समजते. इंडियन ट्रेड प्रमोशनल ऑरगनायझेशन तर्फे हा मेळा आयोजित केला जात आहे. गतवर्षी या मेळ्यात भारतीयांकडून पाकिस्तानी उत्पादनांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे यंदा पाकिस्तानी कंपन्यांची संख्या वाढली असल्याचेही सांगितले जात आहे.

यंदा या मेळ्यात २५ देश सहभागी होत आहेत. त्यात प्रथमच सामील होणार्यात देशात कोरिया, कुवेत, बांग्ला देश, जर्मनी, तिबेट, किरगिस्तान यांचा समावेश आहे. पाकिस्तानने या मेळ्यासाठी ९०० चौरस मीटर जागा बुक केली असून आणखी २५० चौरस मीटर जागेसाठी मागणी नोंदविली आहे. कोरियाने २०० तर द.आफ्रिकेने ५०० चौरस मीटर जागा बुक केली आहे. गतवर्षीच्या मेळ्यासाठी पाकमधून ८७ कंपन्या आल्या होत्या. या मेळ्यात हँडीक्राफ्ट, कपडे, मसाले उत्पादक कंपन्यांचाही सहभाग आहे.

Leave a Comment