खुशखबर, २०१५मध्ये २० हजारी होणार सोने!

gold
नवी दिल्ली – डॉलरच्या मुल्यात येणाऱ्या स्थैर्यामुळे आगामी काळात सोने आणखी स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या सुधारणेमुळे डॉलरचे भाव इतर चलनांच्या तुलनेत दिवसेंदिवस मजबूत होत आहे. जागतिक बाजारात सोने सध्या निचांकी पातळीवर आहे.

या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा दर ११०० डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता एबीएन अॅमरोने वर्तविली आहे. २०१५ च्या अकेरीपर्यंततर ही पातळी ८०० डॉलर प्रति औंसवर पोहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्यामुळे परदेशी बाजारांमध्ये दर ११०० डॉलरच्या खाली आला तर याठिकाणी याची किंमत २४ ते २५ हजार रुपये तोळा राहील. पण आंतरराष्ट्रीय दर ८०० डॉलरवर आल्यास प्रतितोळा सोने २० हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे.

Leave a Comment