आता चेक वठल्याचा देखील येणार एसएमएस

cheque
मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता चेक व्यवहारातही ग्राहकांना एसएमएस सुविधा देणे बँकांना बंधनकारक केले असून या सुविधेअंतर्गत चेक वठवण्यासाठी आल्यानंतर खातेधारक आणि पैसे काढणारा दोघांना तात्काळ एसएमएस संदेशाव्दारे बँकांकडून सूचना मिळणार आहे.

मोठया रक्कमांच्या धनादेशाचे व्यवहार किंवा काही धनादेश व्यवहारांमध्ये संशय वाटल्यास तात्काळ खातेधारकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधा असे आरबीआयने बँकांना सांगितले आहे. धनादेशा संदर्भातील घोटाळे वाढणे ही चिंताजनक बाब आहे. अशा व्यवहारांमध्ये थोडी सर्तकता-सावधानता बाळगली तर हे घोटाळे रोखता येऊ शकतात असे आरबीआयने सर्व बँकांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment