मुदतवाढ मिळालेल्या बाजार समित्या बरखास्त करा – सहकार मंत्री

chandrakant-patil
मुंबई – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शंभरहून अधिक बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचादेखील समावेश आहे. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपूनही वारंवार मुदतवाढ देण्यात आलेल्या आणि ज्या समित्यांवर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे, अशा सुमारे शंभर बाजार समित्या बरखास्त करण्याचा धाडसी निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. त्याचबरोबर सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार कारवाई करण्यात आलेल्या; परंतु स्थगिती मिळालेल्या २०० सहकारी संस्थाचे स्थगिती आदेश उठवण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या आश्रयाने या बाजार समित्या मुदत संपल्यानंतरही सुरू ठेवण्यात आल्या होत्या. नव्या सरकारने या समित्या बरखास्त करत, बाजार समित्यांचा राजकीय बाजारच बंद करण्याचा दणका दिला आहे.

Leave a Comment