मुंबई – देशाबरोबर महाराष्ट्रातही स्वबळाची भाषा करीत सत्ता स्थापन केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही आपला एकहाती झेंडा फडकावण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेतही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे पक्षाने ठरविल्याची माहिती पक्षातील सूत्रांनीच दिली.
भाजप स्वबळावर मुंबई पालिकाही लढणार
देशातील एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका ही ओळखली जाते. या महापालिकेवर गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. एकूण २२७ सदस्य संख्येपैकी शिवसेनेचे ७५ आणि भाजपचे ३१ नगरसेवक आहेत. १३ अपक्षांच्या मदतीने युतीने महापालिका ताब्यात ठेवलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला चांगली मते मिळाल्यामुळे महापालिकेची सत्ता एकहाती मिळवणे पक्षाला अवघड जाणार नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.