अॅपल वन संगणकासाठी ३ कोटींवर किंमत

jobs
अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याने त्याच्या वडिलांच्या गॅरेजमधून स्वतः विकलेला अॅपल वन संगणक डिसेंबरमध्ये ख्रिस्टीतर्फे होत असलेल्या लिलावात विक्रीसाठी येत असून त्याला ३ कोटी ७० लाख रूपये किंमत मिळेल असा विश्वास लिलावकर्ते मॅक विनिश यांनी व्यक्त केला आहे. १९७६ साली हा पर्सनल संगणक ६०० डॉलर्समध्ये विकला गेला होता. मूळ मालक चार्लस रिकेट यांच्यावरून त्याचे नाव रिकेट अॅपल १ असे केले गेले आहे.

अॅपलने सुरवातीला तयार केलेल्या संगणकांपैकी जगात सध्या साधारण ५० संगणक अजूनही शिल्लक आहेत असे सांगितले जाते. रिकेट अॅपल हा अजूनही चालू स्थितीत असलेला एकमेव संगणक असल्याचा दावाही केला जात आहे. आज अॅपलचे आयफोन आणि आयपॅड अगदी लहान मुलच्या हातात सर्रास दिसत असले तरी अॅपल वन हा डिजिटल क्रांती घडविणारा संगणक मानला जातो व त्यामुळेच त्याचे आकर्षण आजही कायम आहे असेही लिलावकर्त्यांचे म्हणणे आहे.

हा संगणक स्टीव्हने विकल्यानंतर तो रॉबर्ट ल्यूथर यांनी २००४ सालात पोलिसांकडून स्टोरेज लोकर मालाचा सेल केला जातो त्यातून विकत घेतला होता मात्र त्याला या संगणकाचा इतिहास माहिती नव्हता. मात्र मॅक यांच्या म्हणण्यानुसार संगणक खरेदीवेळी दिलेल्या कॅन्सल चेकवरून त्यांच्या मालकाचा तपास लावला गेला. आता हा संगणक त्या कॅन्सल चेकसोबत विकला जाणार आहे असे समजते.