सेबीने दिले पर्ल्सच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

sebi
मुंबई : लाखो गुंतवणुकदारांना कोटयावधींचा चुना लावणाऱ्या पर्ल्सच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सेबीने दिले असून, सर्व ९ संचालकांना देशाबाहेर जाण्यास सीबीआयने मज्जाव केला आहे.

पर्ल्सच्या संचालकांवर फसवणुकीचा आरोप ठेवत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सेबीने दिल्यामुळे सर्व ९ संचालकांवर कारवाईचा फार्स आवळला आहे. तर सीबीआयने भारतातील सर्व विमानतळांना पर्ल्सच्या सर्व संचालकांची माहिती देण्यात आली आहे. मराठवाडयातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो गुंतवणूकदारांचे १० हजार कोटी रूपये पर्ल्समध्ये अडकल्याची शक्यता आहे.

Leave a Comment