रिपब्लिकन पार्टीचा अमेरिकन सिनेटवर ताबा

amercia
वॉशिंग्टन – रिपब्लिकन पार्टीने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून अमेरिकन सिनेटवर ताबा मिळविला आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकनला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून निर्विवाद राज्य करीत असलेले राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या डेमोक्रेटिक पार्टीपुढे या निवडणूक निकालांनी गंभीर पेच निर्माण केला आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, भारतीय वंशाच्या बहुतांश उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार संपूर्ण अमेरिकेत विजयी झाले आहेत. देशात सध्या रिपब्लिकन पक्षाचीच लाट असल्याचा दावा राजकीय विश्‍लेषकांनी केला आहे. या निकालांमुळे ओबामा यांना आपल्या शेवटच्या दोन वर्षांच्या सत्ताकाळात महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण जाणार आहे. प्रतिनिधी सभागृहाच्या सर्वच ४३५ जागा, सिनेटच्या १०० पैकी ३६ आणि अमेरिकेतील ५० पैकी ३६ गव्हर्नर पदांकरिता पोटनिवडणुका घेण्यात आल्या.

Leave a Comment