महिलेने शौचालयासाठी विकले सौभाग्याचे लेणे

sangeeta
वाशिम – सरकारकडून ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. शौचालय बांधण्यासाठी विविध प्रकारचे अनुदान देण्यात येते. तरीही नागरिक शौचालय बांधून घेत नसल्यामुळे; महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

गेल्या अनेक दिवसांपासून वाशिममधील सायखेडा गावातील संगीता आव्हाळे यांनाही याच त्रासाला सामोरे जावे लागत होते. घरात शौचालय नसल्याने संगीता यांना गावातील इतर महिलांप्रमाणे दररोज उघड्यावर शौचाला जावे लागत असे. सततच्या होणा-या त्रासामुळे कंटाळून संगीता यांनी पतीकडे शौचालय बांधण्याची मागणी केली होती. वारंवार मागणी करुनही पतीने दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी आपले मंगळसूत्र विकून शौचालय बांधले.

संगीता यांच्या धाडसी निर्णयाबद्दल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्यांचा मंगळसूत्र देऊन सत्कार केला आहे.

Leave a Comment