प्रणिती शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी : ओवेसी

mim
सोलापूर : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमसंदर्भात काल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नसल्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी केली होती. एमआयएमनेही शिंदे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले असून प्रणिती शिंदे यांनी केवळ नैराश्येतून अशा प्रकारची वक्तव्य केल्याचे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

आम्ही काँग्रेससोबत असताना निर्बंध का घातले नाहीत, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीआधी सुशीलकुमार शिंदे यांनी एमआयएमचा पाठिंबा मागितला होता, असा गौप्यस्फोटही ओवेसी यांनी केला आहे. तसेच जर का आमची भाषणे आक्षपार्ह वाटत असतील तर पोलिसांत तक्रार करावी, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला आहे.

Leave a Comment