जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी १५ व्या स्थानी

modi1
न्यूयॉर्क – फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या स्थानावर आहेत. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पहिल्या तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यादीत दुस-या स्थानावर आहे.

भारतातातील रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी जगातील ७२ प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ३६ व्या स्थानावर आहेत तर आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल ५७ व्या स्थानावर आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला ६४ व्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सच्या य़ा यादीत यंदा पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-अल-सिसी यांच्यासह १२ नवीन व्यक्तींचा समावेश आहे. सलग दुस-या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यादीत पहिले स्थान कायम राखले आहे. या यादीत गेल्यावर्षीप्रमाणेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तिस-या, पोप फ्रान्सिस चौथ्या तर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल पाचव्या स्थानावर कायम आहे.

Leave a Comment