आधारचा कैद्यांनाही मिळाला ‘आधार’

aadhar
पुणे – सर्वसामान्यांचा ‘आधार’ ठरलेले आधार कार्ड आता महाराष्ट्रातील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या हजारो कैद्यांचाही ‘आधार’ ठरले असून या कैद्यांना आधारमुळे स्वत:ची ओळख मिळाली आहे. एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे ११ कारागृहांमधील सात हजारांपेक्षा जास्त कैद्यांचे आधार कार्ड कारागृह प्रशासनाने तयार केले आहे.

देशभरातील कैद्यांना आधार कार्डच्या माध्यमातून स्वत:ची राष्ट्रीय ओळख मिळावी, या उद्देशाने प्रशासन कामाला लागले आहे. महाराष्ट्रातही ही मोहीम प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या पुण्याच्या येरवडा तुरुंगातील तर सर्वच कैद्यांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. या कारागृहात तीन हजारावर कैदी आहेत.

Leave a Comment