जळगाव – आजच्या परिस्थिती कोण-कोण माझ्यासोबत आहेत, हे मला कळेल’ असा भावनिक टोकाचा निर्णय घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगावच्या मनसेसैनिकांनी पुन्हा एकाकी पाडले आहे. जळगाव जिल्हाध्यक्षांसह ४७ पदाधिकार्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
जळगावात ४७ मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर गळती लागली असून नाशिकपाठोपाठ आता जळगावमध्येही मनसेची पडझड सुरू झाली आहे. मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह ४७ पदाधिकार्यांनी अध्यक्ष राज ठाकरेंकडे आपले राजीनामे पाठवले आहेत.