आता घ्या… आणखी एक नवीन वादळ

bengal
मुंबई – हुदहुद आणि निलोफर या वादळांनंतर आता आणखी एक वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे.

निलोफर हे वादळ शांत झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे गुरुवारपर्यंत अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर हे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता वेधशाळेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात हिंदी महासागरात वादळांना पोषक परिस्थिती निर्माण होते, त्याचाच परिणाम हे नवीन वादळ असल्याचे हवामान खात्याच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment