पुणे : पुण्यात युवा सेनेच्या शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून हल्ला झालेल्या युवा सेना शहर प्रमुखाचे नाव नितिन भुजबळ असे आहे.
युवा सेनेच्या शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ हे कारने आपल्या कार्यालयाकडे निघाले असता वाटेत वडगाव शेरी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी त्यांची कार अडविली. त्यावरून सुरु झालेल्या वादामुळे तेथे आणखी एका दुचाकीवरून दोघेजण तेथे आले. त्यातील एकाने भुजबळ यांच्या डोक्यावर आणि शरीरावर तलवारीने वार केले. त्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भुजबळ यांना पुण्यातील जहांगीर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.