सचिनच्या आरोपांना चॅपेल यांचे प्रतिउत्तर

sachin
नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी केला आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चॅपेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सचिनने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. आयसीसीच्या २००७च्या वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडऐवजी सचिन तेंडुलकरने टीम इंडियाची जबाबदारी संभाळावी, अशी माझी कधीही इच्छा नव्हती. त्यामुळे सचिनचे आरोप आश्चर्यजनक आहेत, असे चॅपेल यांनी म्हटले आहे.

आपल्या चोवीस वर्षांच्या कारकीर्दीत कधीही कुणाबद्दल वाईट न बोललेल्या सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांची ‘रिंगमास्टर’ म्हणून तुलना केली असल्याचे वृत्त आहे.

सचिन तेंडुलकरच्या ‘प्लेईंग इट माय वे’ या आत्मचरित्राचे सहा नोव्हेंबरला प्रकाशन होत आहे. या आत्मचरित्रात सचिनने ग्रेग चॅपेल यांचा उल्लेख रिंगमास्टर म्हणून केल्याचे वृत्त आहे.

चॅपेल यांनी नेहमीच आपल्या मनातल्या कल्पना खेळाडूंवर लादण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सचिनने केला आहे. २००७ सालचा विश्वचषक अगदी तोंडावर आलेला असताना चॅपेल यांनी कर्णधार राहुल द्रविडला बदलण्याचा निष्फळ प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोटही सचिनने आत्मचरित्रात केला आहे. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिनने केलेल्या खुलाशाने आपल्याला आश्चर्य वाटलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment