सुरक्षेच्या बाबतीत नापास झाल्या मारुति स्विफ्ट आणि डटसन गो

car
नवी दिल्ली – मारुतीची लोकप्रिय कार स्विफ्ट आणि डटसन गो या दोन्ही गाड्या एका सुरक्षा परीक्षेत नापास झाल्या आहेत. याबाबतची माहिती एका संकेतस्थळाने दिली असून त्यांच्या अनुसार ग्लोबल कार सुरक्षितता संघटनेच्या वतीने या दोन्ही गाड्यांच्या वेग-वेगळ्या चाचण्या केल्या त्या दरम्यान या गाड्या या चाचण्यांमध्ये नापास झाल्या आहेत.

मारुती स्विफ्टचे दोन मॉडेल ताशी ६४ किमी चालवून ठोकली असता झालेल्या अपघातात गाडी बसविलेल्या पुतळ्यांना गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले. या चाचणीसाठी स्विफ्ट या गाड्या दक्षिण अमेरिका आणि भारतातून मागविल्या होत्या. त्यातल्या अमेरिकेतून आलेल्या गाडीमध्ये एअरबॅग होत्या.

त्याचप्रमाणे डटसन गो ह्या गाडीला मारुति अल्टो आणि हुंडईच्या इओन यांच्या बरोबरीची गाडी मानली जाते. सव्वा तीन लाखात उपलब्ध होणारी गाडीत एअरबॅग आणि एबीएस सुविधा उपलब्ध नाही. ह्या गाडीची देखील अशी चाचणी केली असता गाडीचा चक्काचूर झाला.

यापूर्वी देखील भारतातील चार कार अशा सुरक्षिततेच्या अभावामुळे नापास झाल्या होत्या. ज्यामध्ये टाटाची नॅनो, हुंडईची आय १० आणि मारुति अल्टोचा समावेश होता.

Leave a Comment