सर्वोच्च न्यायालयात स्पॉटफिक्सिंगचा अहवाल सादर

supreme-court
नवी दिल्ली – मुदगल समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला असून आता १० नोव्हेंबरला या अहवालावर सुनावणी होणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण आयपीएलच्या सहाव्या पर्वात घडले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष नारायणस्वामी श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मैयप्पन, क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर या प्रकरणात फिक्सिंगचे आरोप आहेत. मुदगल समितीतर्फे या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्याचा अंतिम अहवाल समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात बंद लिफाप्यात सादर केल्याचे समितीचे वकील राजब रामचंद्रन यांनी सांगितले.

मुदगल यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या या समितीमध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव, वकील निलय दत्ता, पोलिस उप महासंचालक (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) बी. बी. मिश्रा तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा समावेश होता.

Leave a Comment