डेंग्यूवरील लसीची चाचणी यशस्वी

dengue
फ्रांन्स- सॅनोफी पाश्चर या फ्रान्समधील कंपनीने गेल्या वर्षी डेंग्यूवर लस तयार केली आहे. या लसीची भारतातील रुग्णांवर घेतलेली चाचणी यशस्वी ठरली असून पुढील वर्षाच्या अखेरीस ही लस भारतात उपलब्ध होणार आहे.

सॅनोफी पाश्चर या कंपनीने गेल्या वर्षी डेंग्यूवर लस तयार केली होती. आशियाई देशांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच फ्रेंच कंपनीने तयार केलेली ही लस दिलासा देणारे ठरली होती. या लशीची भारतातील चाचणी नुकतीच पार पडली. यात दिल्ली, बंगळुरु, पुणे आणि कोलकाता येथील १८ ते ४५ वयोगटातील रुग्णांना ही डेंग्यूरोधक लस देण्यात आली होती.

भारतात या लसीची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता मलेरिया आणि अन्य रोगांवरही संशोधन करणार असल्याचे कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. निकोलस जॅक्सन यांनी सांगितले.