नवी दिल्ली : संगणक विक्रीत अग्रेसर असलेल्या एचपी या कंपनीनेही आपले ‘एमबी क्रोनोविग’ या नावाचे स्मार्टवॉच बाजारात आणले आहे. या आकर्षक दिसणा-या या स्मार्टवॉचची किंमत २१,४०० रूपये इतकी आहे.
‘एचपी’ने आणले ‘एमबी क्रोनोविग’ स्मार्टवॉच
डिजाइनर मायकल बास्टियन यांच्या सोबत ‘एचपी’ने या स्मार्टवॉचची निर्मिती केली असून हे स्मार्टवॉच आयफोन ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. या स्मार्टवॉचमध्ये मॅसेज आणि ई-मेलही पाहता येतात. गिल्ट डॉट कॉम या ऑनलाईन संकेतस्थळावर या स्मार्टवॉचची विक्री करण्यात येणार आहे. येत्या ७ नोव्हेंबरपासून याचे बुकींग सुरू होणार आहे.