राज्यातील नव्या सरकारचे खातेवाटप जाहीर

devendra
मुंबई – राज्यात सरकार स्थापन करून त्यानंतर खातेवाटपाला विलंब लावणा-या भाजप सरकारने अखेर खातेवाटप जाहीर केले असून त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती रहाणार आहेत.

गृहखात्यासाठी इच्छुक विनोद तावडे यांना शालेय शिक्षण आणि उच्च, तंत्रशिक्षण खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. विदर्भातून येणारे भाजपचे दुसरे नेते आणि नितीन गडकरी यांचे समर्थक सुधीर मुनगंटीवार यांना महत्वाच्या अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना महसूल खाते मिळाले आहे. महिला आणि बालविकास खात्यासाठी पंकजा पालवे-मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्याकड़े ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते सोपवण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे शिक्षक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन विभागाची सूत्रे दिली आहेत.

विष्णू सावरा यांच्याकडे आदिवसी विकास मंत्रालय तर, मुंबईचे आमदार प्रकाश मेहता यांना खाण आणि उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. वरील सर्व महत्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांना मिळाल्याने, शिवसेनेच्या वाटयाला कुठली मंत्रिपदे येणार, नव्या सरकारमध्ये शिवसेनेचे समाधान होणार का ? अशी चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस – गृह आणि नगरविकास, सुधीर मुनगंटीवार – अर्थ, नियोजन आणि वन, एकनाथ खडसे -महसूल, अल्पसंख्याक विकास, कृषी, पशुपालन, मस्त्य, दुग्धविकास , विनोद तावडे -शालेय शिक्षण, उच्च, तंत्रशिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य, पंकजा मुंडे – ग्रामविकास, जलसंवर्धन, महिला आणि बालविकास, प्रकाश मेहता – उद्योग, खाण, संसदीय कामकाज, विष्णू सावरा – आदिवासी विकास, सामाजिक न्याय, चंद्रकांत पाटील -सहकार व पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, दिलीप काबंळे (राज्यमंत्री) – आदिवासी विकास, सामाजिक न्याय, विद्या ठाकूर (राज्यमंत्री) – ग्रामीण विकास, जलसंवर्धन, महिला आणि बाल कल्याण

Leave a Comment