स्मार्टफोनच्या जगात आले सॅमसंगचे ए३, ए५

samsung
नवी दिल्ली : मोबाईल क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या सॅमसंग या मोबाईल कंपनीने ए श्रेणीतील ‘गॅलक्सी ए५’ आणि ‘गॅलक्सी ए३’ असे आपले दोन र्स्माटफोन बाजारात आणले आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड ४.४ किटकॅट व्हर्जनवर आधारीत असून, ते एल.टी.ई. कनेक्टिवीटीसह उपलब्ध करण्यात आले आहेत. यापैकी ‘गॅलक्सी ए३’ मध्ये ८ मेगापिक्सल रियर आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन १.२ जीएचझेडच्या कॉडकोर प्रासेसरवर आधारित आहे. ४.५ इंच क्युएचडी एमोलेड डिस्प्ले, १९०० एमएएचची बॅटरी, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोअरेज क्षमता ही या फोनची वैशिष्टये आहेत.तर ‘गॅलक्सी ए५’ मध्ये १३ मेगापिक्सल क्षमतेचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये २३०० एमएएचची बॅटरी आहे. तसेच १.२ जीएचझेडच्या कॉडकोर प्रासेसरसह २ जीबीचा रॅम देण्यात आला आहे. १६ जीबीची इंटरनल मेमरी क्षमता असून, एसडी कार्डच्या माध्यमातून ती वाढविता येणे शक्य आहे. या फोनला ५ इंचचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

Leave a Comment