मोदींच्या स्वच्छता अभियानाची हिलेरी क्लिंटन यांनी केली स्तुती

clinton
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची स्तुती साता समुद्रापार गेली आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनी मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेची तोंड भरून स्तुती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात अमेरिका दौर्‍यावर आले असता मी माझ्या पतीसह त्यांची भेट घेतली. स्वच्छतेसारख्या प्राथमिक गरजेबाबत ते अत्यंत आग्रही दिसले. स्वच्छतागृहांची सोय नसेल तर मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. स्वच्छतागृह नसल्याने महिला आपल्या घरापासून फार लांब जाऊ शकत नाहीत, असे हिलरी क्लिटंन म्हणाल्या.

इंडोनेशियातील बाजारपेठेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांपैकी ९० टक्के कर्मचारी महिला असल्याचे एका ताज्या अभ्यासातून उघडकीस झाले आहे. याच अभ्यासाचा संदर्भ देत हिलरी क्लिटंन म्हणाल्या की, या महिलांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नाही. याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण, महिलांना स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचा सहभाग वाढेल आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेगही वाढेल.

Leave a Comment