बीसीसीआयने मागितली २५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई

cricket
नवी दिल्ली – वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ मानधनाच्या मुद्द्यावरून भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परत गेल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडे २५० कोटी रुपयांची (४२ मिलियन डॉलर्स) नुकसान भरपाई मागितली आहे.

भारत दौरा रद्द करण्याचा वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा निर्णय वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला महागात पडणार असे चित्र होते आणि त्याच प्रमाणे झाले देखील. बीसीसीआय विंडीज क्रिकेट बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडे २५० कोटी रुपयांची (४२ मिलियन डॉलर्स) नुकसान भरपाई बीसीसीआयने मागितली आहे. सध्या तरी दोन्ही देशांमध्ये एकमेकांविरुद्ध कोणतीही मालिका होणार नाही. असा निर्णय हैदराबादमध्ये झालेल्या बैठकीत बीसीसीआयच्या कार्यकारिणीने घेतला होता.

दरम्यान, वेस्ट इंडीजचा दौरा रद्द झाल्याने आता श्रीलंकन संघ भारतात पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. उद्यापासून कटक, हैदराबाद, रांची, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये या सामन्यांचे आयोजन केले आहे. या वन डे मालिकेसाठी भारताचे नेतृत्त्व विराट कोहलीच्या हाती सोपवण्यात आले आहे.

Leave a Comment