आज फडणवीस मंत्रिमंडळाचे खातेवाटप

devendra
मुंबई – शुक्रवारी राज्याच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाला सुरुवात झाली असून राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून, या वेळी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवारी रात्री सहय़ाद्री अतिथी गृहावर नवनिर्वाचित मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. शाह यांच्यासह ओम माथूर यांनी मंत्र्यासोबत सविस्तर चर्चा केली. आजपासून मंत्रिमंडळाच्या कारभाराला ख-या अर्थाने सुरूवात होणार आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होणार आहे.सूत्रांच्या मते, फडणवीस अर्थ खाते स्वत:कडेच ठेवणार आहेत. पंकजांना महिला बालकल्याण देऊ केले आहे पण त्यांना ते नको आहे. खडसेंना महसूल वन, विष्णू सावरांना आदिवासी, कांबळेंना समाजकल्याण, ठाकूर यांना गृहनिर्माण आरोग्य, मेहतांना नगरविकास खाते मिळणे शक्य आहे. मुनगंटीवार महत्त्वाच्या खात्यासाठी अडले आहेत. एका मंत्र्याकडे चार ते पाच खाती असू शकतात.

११ नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन : ११ नोव्हेंबरपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात फडणवीस बहुमत सिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याचबरोबर ४४वर्षीय फडणवीस हे राज्याचे २७ वे मुख्यमंत्री तर या खुर्चीवर बसणारे १८ वे व्यक्ती आहेत. ते शरद पवारांनंतरचे सर्वात तरुण दुसरे मुख्यमंत्री आहेत. पवार ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले होते.

Leave a Comment