पुणे – दिवाळीनंतर राज्यात दाखल झालेल्या थंडीचा परिणाम आता पुण्यात जाणवू लागला असून किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे शहरासह जिल्ह्याच्या अनेक परिसरात रात्री शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसू लागले असून नागरिक गरम कपडे खरेदी करीत असल्याचे चित्र पुणे शहरात दिसत आहे.
पुणे परिसरात थंडीचा जोर वाढला
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे थंडीची जाणीव होत आहे. शुक्रवारी कोकण- गोव्यातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी शहरांच्या किमान तापमानात घट झाल्याचे आढळले.