बंगळूरु – केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आज कन्नडा राज्योत्सवाच्या निमित्ताने बेळगाव आणि अन्य शहरांच्या नामांतराला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचले आहे. तत्पूर्वी मोदी सरकारने बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
पंतप्रधानांच्या बेळगाव आणि अन्य शहरांच्या नामांतराला शुभेच्छा
आज कर्नाटक दिन आहे आणि आजपासूनच बेळगाव आणि अन्य शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. येणा-या वर्षात कर्नाटकने प्रगतीची नवी उंची गाठो असे मोदींनी आपल्या टि्वटर अकाऊंटवर शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.