औरंगाबाद – विधानसभेतील अपयशानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पानिपत झाले. त्यात अनेक मंत्री, आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केले होते. त्यानंतर आता औरंगाबाद महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एमआयएमच्या वाटेवर राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक
एमआयएमच्या संपर्कात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक असून त्यापैकी राष्ट्रवादीच्या जुबेर लाला, अक्रम पटेल, अशोक बेरे, अफसर खान, कलील खान या पाच नगरसेवकांनी आपला राजीनामा दिला आहे. तर काँग्रेसचेही काही नगरसेवक एमआयएमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.