लॉस एंजलिस – वर्जिन गॅलेक्टिक कंपनीच्या `स्पेसशिप टू’ या अंतराळ यानाचे परिक्षण सुरू असतांना कॅलिफोर्नियात अपघात झाला. ज्यामध्ये दोन वैमानिकांसह एकाचा मृत्यू झाला आहे. विमानाचे अवशेष येथील वाळवंटात अस्ताव्यस्त पडले आहेत.
अमेरिकेच्या अंतराळ यानाला अपघात
अमेरिकन अंतराळयान दुर्घटनाग्रस्त होण्याची आठवडय़ाभरातील ही दुसरी वेळ आहे. मंगळवारी नासाने पाठवलेले मानव विरहित ऑर्बिटल साइन्सेस रॉकेट प्रक्षेपणानंतरच दुर्घटनाग्रस्त झाले होते. दरम्यान, वर्जिनचे प्रमुख घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पायलटबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.