श्रीलंकेत भारतीय मच्छीमारांना फाशीची शिक्षा

fishermen
कोलंबो – श्रीलंकेत अंमली पदार्थाची तस्करी केल्याचा आरोप ठेवत भारताच्या पाच मच्छीमारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भारतीय दूतावास या निकालाच्या विरोधात श्रीलंकेतील सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

२०११ मध्ये तामीळनाडूतील पाच मच्छीमारांना अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने पकडले होते. त्यापैकी पाच मच्छीमारांना श्रीलंकेतील कोलंबो उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रीथी पदमन सुरासेना यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

या निकालावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली असून या निकालानंतर परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, या निकालाच्या विरोधात श्रीलंकेतील भारतीय दूतावास वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. कायदेशीर व अधिकारी स्तरावर ही लढाई लढली जाईल. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment