…आणि उपस्थितीत राहणार शिवसेना पक्षप्रमुख

shivsena
मुंबई – शिवसेनेने कडक भूमिका घेताच भाजपने थोडे नमते घेण्याचे धोरण ठरविल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली.

आम्ही शिवसेनेच्या मागण्यांचा व प्रस्तावाचा सकारात्मक विचार करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन अमित शहा यांनी उद्धव यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही आज दुपारी पुन्हा एकदा फोन करून उद्धव ठाकरेंना वस्तुस्तिथीची माहिती दिली व सोहळ्यात सामील होण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत आजच्या सोहळ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे आमदारही या सोहळ्यात सहभागी होतील असे राऊत यांनी या घडामोडीनंतर माहिती देताना सांगितले.

Leave a Comment