भोपाळ गॅसकांडातील अँडरसन यांचे निधन

anderson
न्यूयॉर्क – १९८४मध्ये मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे झालेल्या गॅस दुर्घटनेशी संबंधित युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन कंपनीचे माजी प्रमुख वॉरेन अँडरसन यांचे अमेरिकेत निधन झाले. ते ९२ वर्षाचे होतेजगाच्या इतिहासात सर्वात भीषण अशा या औद्योगिक दुर्घटनेमध्ये तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अँडर्सन यांचे २९ सप्टेंबर रोजी सप्टेंबर रोजी फ्लोरिडातील वेरो बीच येथील रुग्णालयात निधन झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. या खटल्यादरम्यान एकदाही हजर न राहिल्याबद्दल न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. या दुर्घटनेनंतर चार दिवसांनी त्यांनी भोपाळला भेट दिली होती. त्यानंतर त्यांना अटक सुद्धा झाली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर ते अमेरिकेला गेले.

Leave a Comment