लीड्स – जागतिक बिलियर्ड्सचे (टाइम फॉरमॅट) जेतेपद भारताचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवानीने पटकावले असून अंतिम फेरीत रॉबर्ट हॉलला त्याने मोठ्या फरकाने हरवले.
पंकजने पटकावले जागतिक बिलियर्ड्सचे जेतेपद
पंकजचे हे विक्रमी १२वे जागतिक बिलियर्ड्स जेतेपद असून एकाच वर्षात छोट्या आणि मोठ्या फॉरमॅटमध्ये बाजी मारण्याची पंकजची ही तिसरी वेळ आहे. ‘ग्रँड डबल’चा मान त्याने तिस-यांदा पटकावला. बंगलोरच्या ‘गोल्डन बॉय’ने यापूर्वी माल्टा (२००५) आणि भारतात (२००८) त्याने ‘ग्रँड डबल’ची करामत साधली होती.